विकासासाठी सहकार पॅनलला आशीर्वाद द्या : धीरज देशमुख

0
268

उदगीर : विकासासाठी कटीबद्द असलेल्या सहकार पॅनलला अशीर्वाद द्यावेत असे आवाहन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

सहकारमहर्र्षि, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनेल ९ जागांसाठी निवडणूक लढवत असून रविवारी उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली व लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात उदगीर व जळकोट तालुक्यातील मतदारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बिनविरोध निवड झाल्याबद्दल धिरज देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार धिरज देशमुख म्हणाले की, या निवडणुकीत सहकार पॅनेलचे १९ पैकी १० उमेदवार बिनविरोध आले आहेत. यातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून आजवर झालेल्या विकासाला मिळालेला हा कौल आहे.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी एका विचाराच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिला, शेतकरी, मजूरांचा विकास केला. नागरिकांना सुलभ पद्धतीने घरपोच सुविधा दिल्या. बँकेची ही देदीप्यमान वाटचाल अशीच पुढे सुरू राहील, असा मला विश्वास आहे.

सर्वसामान्यांच्या विकासात आडकाठी घालणा-या, केवळ राजकारण करू पाहणा-याना अजिबात थारा देऊ नका. सहकार पॅनलच्या ९ उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणा, असे ते म्हणाले.

यावेळी सहकार पॅनलचे प्रमुख अ‍ॅड. श्रीपती काकडे, राज्य साखर महासंघाचे चेअरमन आबासाहेब पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश्वर निटुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, बँकेचे व्हाईस चेअरमन व अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज शिरसाट, देवणी मतदारसंघाचे उमेदवार गोविंद भोपनीकर (बिराजदार), इतर मागासवर्गीय मतदारसंघाचे उमेदवार अनुप शेळके, शिरुर अनंतपाळ मतदारसंघाचे उमेदवार व्यंकटराव बिरादार पाटील, भटक्या जमाती व विशेष मागास मतदारसंघाच्या उमेदवार सपना किसवे, महिला मतदारसंघाच्या उमेदवार अनिता केंद्रे व स्वयंप्रभा पाटील, मजूर संस्था मतदारसंघाचे उमेदवार दिलीप पाटील नागराळकर, अशोक गोविंदपूरकर, लक्ष्मीबाई भोसले, मारोती पांडे, संभाजी रेड्डी, कल्याण पाटील, सिद्धेश्वर पाटील, रामभाऊ बिरादार, शीलाताई पाटील, उषा कांबळे आदींसह उदगीर, जळकोट तालुक्यातील चेअरमन मतदार उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here