भाजप खासदाराचे महिला आमदारासोबत गैरवर्तन

0
138
BJP MP's misbehavior with woman MLA

अलीगढ : उत्तर प्रदेशातील अलीगढमधील भाजप खासदार सतीश गौतम सध्या चर्चेत आहेत. भाजप खासदार सतीश गौतम यांनी भरसभेत महिला खासदाराशी गैरवर्तन केल्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे सतीश गौतम चांगलाच चर्चेत आला आहे.

व्हिडिओतील सतीश गौतमचे वागणे आक्षेपार्ह असून सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भाजप खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत.

कोल परिसरात आयोजित एका कार्यक्रमात भाजप खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा सहभागी झाले तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे.

Read More

मोदी आवास घरकुल योजना, लाभार्थी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, जाणून घ्या पूर्ण माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here