Maharashtra BJP | भाजपच्या गोटातून मोठी बातमी, ‘या’ खासदारांचं तिकीट कापलं जाणार

0
153
jp nadda-amit shaha-narendra modi

Maharashtra BJP | पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षांतर्गत जोरदार हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे भाजपकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने महाराष्ट्रात ‘मिशन 45’ सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यापैकी 45 जागांवर भाजपने आपले उमेदवार निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

2024 ची लोकसभा निवडणूक भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भाजप आता आगामी निवडणुकीत काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपमधील काही खासदारांची धास्ती वाढली आहे.

काही खासदारांची तिकिटे कापली तर ते बंडखोरी करून दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार की अपक्ष म्हणून? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात तसे झाल्यास भाजपचे नुकसान होईल. कारण त्यामुळे मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. आगामी काळात या संदर्भात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मात्र सध्या सुत्रांकडून मिळालेली माहिती ही भाजप खासदारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

भाजपच्या खासदारांचा आढावा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब कामगिरी असलेल्या भाजप खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे. लोकसभेसाठी भाजप नव्या चेहऱ्यांची चाचपणी करत आहे. विशेष म्हणजे मुंबईतही काही ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. जे.पी. नड्डा यांनी नुकतेच मुंबई आणि पुण्याला भेट दिली होती. दरम्यान, जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत जे.पी. नड्डा यांनी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची चर्चा आहे.

शिंदे-फडणवीसांशी अमित शहांची बंद दाराआड चर्चा

याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन दिवसांपूर्वी मुंबईला भेट दिली होती. ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याचे वृत्त आहे.

‘या’ खासदारांचे तिकीट कापले जाणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी सुरू आहे. भाजपने प्रत्येक खासदाराचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. ज्या खासदारांची कामगिरी चांगली नसेल त्यांचे तिकीट कापले जाईल. त्याऐवजी भाजप आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. भाजपला राज्यात मिशन 45 राबवायचे आहे. भाजपला हे ध्येय सत्यात उतरवायचे आहे.

भाजपला आता कोणताही धोका पत्करायचा नाही. एखाद्या खासदाराची प्रतिमा खराब झाली असेल किंवा लोकांच्या मनात नाराजी असेल तर खासदाराचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपची योजना आहे. पण भाजपची ही रणनीती काही विद्यमान खासदारांसाठी धोकादायक आहे. भाजपच्या या रणनीतीनुसार भविष्यात काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read More 

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार, लातुरचा देखील समावेश, नवीन जिल्ह्यांची यादी पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here