Beed Crime News | साडेतीन लाखांना विकले बाळ, पाच आरोपींना अटक; मास्टरमाइंडचा शोध सुरु

0
223

बीड : शहरात एका वर्षाच्या बाळाची साडेतीन लाख रुपयांना विक्री करण्यात आली. मात्र, पोलिसांना याची माहिती मिळताच बाळाच्या विक्रीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. तसेच या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाचही जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. माजलगाव तालुक्यातील एका गावातील महिलेला एक वर्षाचा मुलगा असून ती पतीपासून विभक्त झाली आहे.

माजलगाव येथील छाया देशमुख आणि तिचा बुलढाणा जिल्ह्यातील सख्खा भाऊ किशोर भोजने यांनी सुखी आयुष्याचे स्वप्न दाखवत दुसऱ्या लग्नाचे आश्वासन देऊन तिच्या एक वर्षाच्या बाळाची विक्री केली होती. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात हे बाळ गोव्यातील एका महिलेला साडेतीन लाखांना विकल्याचे समोर आले आहे.

ललिता भिसे आणि दीपक गवळकर यांनी सौदा करून ते बाळ गोव्यातील स्वप्नजा जोशी यांना विकले. आप्पा राघोबा केरकर, नामदेव फोंड सावंत यांनी यासाठी मध्यस्थी केली. ललिता आणि दीपक यांनी जोशी यांच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले होते. त्यापैकी 50 हजार रुपये फक्त छाया आणि किशोर यांना देण्यात आले, तर अप्पा केरकर यांना 15 हजार रुपये कमिशन मिळाले.

गोव्यातून तिघांना अटक

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सुरुवातीला किशोर आणि छाया यांना अटक केली होती. त्यानंतर अनैतिक मानवी तस्करी पथकाने बाळ खरेदी करणाऱ्या स्वप्नजा जोशी आणि मध्यस्थ अप्पा केरकर आणि नामदेव सावंत यांना गोव्यातून अटक केली.

त्यांच्याकडून बाळही ताब्यात घेण्यात आले. या सर्वांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यांना पुन्हा एपीआय सुरेखा धस यांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाचही जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करून जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

आरोपींची नावे

छाया श्रीराम देशमुख (वय 38 वर्षे, रा. शाहूनगर, माजलगाव), किशोर वासुदेव भोजने (32२ वर्षे, रा. बुलढाणा), ललिता मनोहर भिसे (38 वर्षे, रा. हातकणंगले जि. कोल्हापूर), दीपक गव्हाळकर ऊर्फ गवळी (रा. बेळगाव) यांचा समावेश आहे. , कर्नाटक) आप्पा राघोबा केरकर (वय 65 वर्षे), नामदेव फोडू सावंत (वय 60 वर्षे) आणि स्वप्नजा महादेव जोशी (वय 38 वर्षे, सर्व रा. सातारी, उत्तर गोवा) अशी आरोपींची नावे आहेत. दीपक आणि ललिता दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here