बाप लेकीच्या नात्याला काळीमा : बापानेच केला स्वतःच्या मुलीवर अत्याचार

0
527
Rape of a 10th standard student; Removed the video and threatened the victim

औरंगाबाद : नराधम बापानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना वाळूज औद्योगिक परिसरात उघडकीस आली आहे.

याप्रकरणी नराधम बापा विरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधम बापाला अटक करण्यात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद वाळूज पोलिस ठाणे हद्यीतील गुरूधानोरा येथे नेवरगाव येथे एक शेतकरी कुटुंब शेती व्यवसाय करतात.

सप्टेंबर 2021 ते जानेवारी 2022 या 5 महिन्याच्या कालावधीत नराधम बापाने आपल्या स्वतःच्या 15 वर्षीय मुलीवर एकटी पाहून वेळोवेळी अत्याचार केले.

विशेष म्हणजे ही माहीती आईसह भावाला सांगितली तर तुझा जीव घेईन अशी धमकी दिली. मात्र, मुलीने त्रास असाह्य झाल्याने आईला माहिती दिली.

या विषयी आईने विरोध करण्याचा प्रयत्न करताच नराधम बापाने मुलीच्या आईच्या डोक्यात फरशी मारून तिला गंभीर जखमी केले.

अखेर मुलीच्या आईने बुधवारी रोजी वाळूज पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी नराधम बापा विरोधात अल्पवयीन मुलीचा छळ, जीवे मारण्याची धमकीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरक्षक विनायक शेळके हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here