उदगीर : भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात यशस्वीपणे सांभाळून संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे कार्य निष्ठेने केल्याबद्दल पार्टीने त्यांनी केलेल्या पक्षकार्याची दखल घेतली आहे तसेच विविध आंदोलने, मोर्चे, रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून सतत पक्ष कार्य करत असलेल्या बापुराव राठोड यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून संपुर्ण लातूर जिल्ह्यात त्यांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दलीत वस्ती, तांडा वस्ती अश्या विविध योजनांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम केले आहे. पक्षासाठी त्यांनी खूप मोठे काम केले आहे. केवळ राजकारणच नाही तर समाजकारण करत सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणे हा बापुराव राठोड यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेवून भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा श्रीमती रुपताई पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रंगारे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेश अप्पा कराड, आ.अभिमन्यू पवार, अरविंद पाटील निलंगेकर, माजी आ. गोविंद केंद्र, माजी आ. सुधाकर भालेराव, भगवान दादा पाटील तळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी त्यांच्यावर पक्षाचा लातूर जिल्हा सरचिटणीस म्हणून जबाबदारी सोपविली आहे.
त्यांच्याकडील कुशल संघटन हे पक्ष वाढीसाठी अत्यंत महत्वाचे आहे, आगामी काळात त्यांच्या कडून पक्ष वाढीसाठी प्रयत्न व्हावेत अशी, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडी बद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, अरविंद पाटील गोजेगावकर, सोमेश्वर सोप्पा सावकार, भागवत गुरमे, प्रा. पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, नंदू सावकार, बालाजी केंद्रे, मनोहर भंडे, दत्ता बुर्ले, मंदाकिनी जिवने, बबिताताई पांढरे, रोहिदास गंभीरे, सत्यवान पांडे, उदयसिंह ठाकूर, गणेश गायकवाड, संजय पाटील मलकापूरकर, माजी सरपंच उद्धव राठोड, प्रदिप जाधव, रणजित पाटील, चंदू चीलकलवार, सागर बिरादार निडेबन जिल्हा परिषद गटातील चांदेगाव चे सरपंच सुधाकर मुसणे, शिरोळ जा चे सरपंच केशव सगर, जानापुरचे सरपंच कल्याण बिरादार, गुरदालळचे सरपंच जिंकलवाड, कुमदाळचे उप सरपंच राम शिलवणे, लिंबगावचे सरपंच प्रशांत चामे, मल्लापुरचे भगवान आडे, बाबुराव राठोड, गायमाळ तांड्याचे तानाजी चव्हाण, रामघाट तांडा, येथील सतिश आडे, बॉर्डर तांड्याचे सुनिल जाधव, श्याम राठोड, राहुल चव्हाण, राजीव पाटील, प्रशांत तोंडारे, बामनीचे संतोष कारभारी, मादलापुरचे बालाजी बनसोडे, तानाजी बनसोडे, मदन पाटील, श्रीकांत काळगापुरे, यांच्या सह अनेकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.