आपण अनेकदा विविध कारणांसाठी बँकेत खाते उघडत असतो, परंतु असे अनेकजण आहेत कि ज्यांचे बँकेत एकापेक्षा जास्त खाती असतात.
हे बहुतेक त्या लोकांसोबत घडते जे कुठेतरी काम करतात आणि कंपनी बदलल्यामुळे बँक खाते देखील बदलावे लागते. अशा परिस्थितीत लोक नवीन खात्यात व्यवहार करू लागतात आणि जुन्या खात्याचा वापर बंद केला जातो. (Bank account inactive)
अशा परिस्थितीत, जर काही महिन्यांपर्यंत ग्राहकांच्या झिरो बॅलन्स सॅलरी अकाउंट मध्ये पगार खात्यात पगार जमा नसेल, तर बँका त्याचे बचत खात्यात रूपांतर करतात, ज्यामध्ये ग्राहकांना किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. त्यामुळे असे खाते तातडीने बंद करण्याची गरज आहे.
तुमचे नुकसान होऊ शकते
तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल तर तुम्ही तुमचे जुने बँक खाते त्वरित बंद करावे असे न केल्यास तुमचेच नुकसान होईल.
बँक खाते कसे बंद करू शकता ते याठिकाणी जाणून घ्या
प्रथम खात्यातील बॅलन्स शून्य करा.
तुम्हाला कोणते बँक बचत खाते बंद करायचे आहे हे तुम्ही ठरविल्यानंतर त्या खात्यातून सर्व पैसे काढा.
हे काम तुम्ही एटीएममधून किंवा ऑनलाइन ट्रान्सफरच्या मदतीने करू शकता.
याशिवाय, तुमचे खाते बंद करताना, तुम्ही तुमच्या खात्याशी लिंक केलेले सर्व डेबिट डीलिंक केले पाहिजेत.
जर तुमचे हे बँक खाते मासिक कर्ज EMI साठी लिंक केलेले असेल, तर तुम्ही कर्ज देणार्या व्यक्तीला किंवा संस्थेला नवीन खाते क्रमांक द्यावा.
एका वर्षापेक्षा जुन्या खात्यांवर कोणतेही क्लोजर चार्ज नाही.
साधारणपणे, बँका बचत खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आत बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत.
14 दिवस ते 1 वर्षाच्या कालावधीत खाते बंद केल्यास तुम्हाला क्लोजर चार्जेस भरावे लागतील. बँका साधारणपणे एक वर्षापेक्षा जुने खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत.
खाते ‘अशा’ प्रकारे बंद केले जाऊ शकते
तुमचे खाते बंद करण्यासाठी तुम्हाला शाखेत जावे लागेल. येथे तुम्हाला खाते बंद करण्याचा फॉर्म भरावा लागेल.
या फॉर्मसह, तुम्हाला डी-लिंकिंग फॉर्म देखील सबमिट करावा लागेल. यासोबतच तुम्हाला तुमचे चेकबुक, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड देखील बँकेत जमा करावे लागेल.