उत्कृष्ट अभियंता अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची एमएसआरडीसीच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

0
621

मुंबई : महाराष्ट्र शासनाने दोन वेळा उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे.

अनिलकुमार बळीराम गायकवाड हे नुकतेच बांधकाम सचिव पदावरून सेवा निवृत्त झाले होते. त्यांचे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात खूप मोठे योगदान आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग चे काम सुरुवाती पासून ते संपे पर्यंत अनिलकुमार गायकवाड यांचा त्या कामी मोठा सहभाग आहे. अधिग्रहण पासून ते रोड तयार होई पर्यंत ची सर्व टेक्निकल बाजू भक्कम पणे सांभाळी आहे.जवळ पास ८५% काम पूर्ण झाले आहे.

आता उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी साधारण दोन वर्ष आणखी कालावधी लागेल त्या साठी अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना पुन्हा सेवे मध्ये रुजू करून घेतले आहे, जेणे करून महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी ते अत्यंत आवश्यक होते.

महाराष्ट्र शासनाने त्यांची पुन्हा नियुक्ती केल्याने हा मार्ग लवकरच पूर्णत्वास जाईल अशी खात्री आहे.
त्यांनी केलेल्या अनेक महत्त्वाच्या कामापैकी पुणे मुंबई एक्स्प्रेस वे, मुबई तील सी लिंक, मुंबई आणि ठाणे शहरातील सर्व उड्डाण पुले, समृद्धी एक्स्प्रेस वे, मुंबईतील विलासराव देशमुख फ्री वे, महाराष्ट्र च्या मंत्रालयाचे आधुनिकीकरण, मुंबई हायकोर्ट इमारत दुरुस्ती, हाई माऊंट बिल्डिंग, सह्याद्री इमारत, विशेष म्हणजे देशाच्या राजधानी दिल्लीतील देखणी इमारत महाराष्ट्र सदन, नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धाटन केलेले देशातील पहिले नवीन टेक्नॉलॉजीचे पुल, देशातील नदीवर तयार केलेले सर्वांत उंच लोखंडी पुल, देशातील सर्वाधिक लांब असा आठ किलोमीटरचा बोगदा असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उत्कृष्ट अभियंता अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनी पूर्ण केले आहेत. त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here