सोयाबीन विविध वाणाचा मोठया प्रमाणात बिजोत्पादन कार्यक्रम आरक्षण करुन घेण्याचे आवाहन

0
460

लातूर : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून दरवर्षी राज्यातील बिजोत्पादकांमार्फत विविध पीक वाणांचा प्रमाणित/पायाभुत बिजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

या अनुषंगाने खरीप 2022 हंगामाची सोयाबीन बियाण्याची राज्याची पुर्तता करण्याचे दृष्टीने महामंडळाने उन्हाळी 2021-22 हंगामामध्ये MASU-612,MASU-158, MASU-162, MASU-71,फुले संगम (KDS-726),फुले किमया, या वाणाचा प्रमाणित/पायाभुत दर्जाचा बिजोत्पादन कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचे ठरविलेले आहे.

महामंडळास नियोजित बिजोत्पादन कार्यक्रम हा 15 जानेवारी 2022 पुर्वी राबवायचा असून इच्छुक बिजोत्पादकांनी या बिजोत्पादन कार्यक्रम संबंधीत स्त्रोत बियाणे, स्त्रोत बियाणे किंमत, उन्हाळी 2021-22 हंगामातील महामंडळाचे सोयाबीन बिजोत्पादनाचे खरेदी धोरण इ. विषयी माहिती संबंधीत जिल्हयाचे महाबीज जिल्हा कार्यालयाकडून उपलब्ध करून घेवून बिजोत्पादन कार्यक्रमाचे आरक्षण करण्यासाठी ७/१२, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत देऊन आपले आरक्षण करून घेण्यात यावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाबीज लातूर यांनी केले आहे.

संपर्कासाठी पूढील प्रमाणे सहायक क्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. जिल्हा व्यवस्थापक, महाबीज लातूर मोबाईल क्रं-8669642739, सहायक क्षेत्र अधिकारी लातुर/ रेणापुर मोबाईल क्रं- 9850856230, सहायक क्षेत्र अधिकारी औसा/ निलंगा/ देवणी/ जळकोट मोबाईल क्रं—8978047777, सहायक क्षेत्र अधिकारी चाकुर/ शिरूर अंनतपाल मोबाईल क्रं- 8623916725 व सहायक क्षेत्र अधिकारी अहमदपुर/ उदगीर/ जळकोट मोबाईल क्रं-9850026718 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here