WhatsApp वर एखाद्याच्या सततच्या मेसेजने वैताग आला? Block न करताच अशी करा सुटका, पाहा सोपी ट्रिक

0
576

WhatsApp वर दररोज मित्रांचे किंवा इतर अनेकांचे सतत प्रेरणा देणारे, गुड मॉर्निंग किंवा विविध जयंतींच्या, सणाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस येत असतात.

विशेष म्हणजे मेसेजेस करणारे हे लोक आप्तस्वकीय असल्याने त्यांना ‘मेसेज करू नका म्हणणं’ अवघड असतं. परंतु आता तुम्हाला या समस्येपासून (How To Stop Texting a Friend So Much) सुटका हवी असेल तर हे मेसेजेस व्हॉट्सअ‍ॅपवर बंद करता येतात. समोरच्या व्यक्तीला ब्लॉक न करताच सततच्या मेसेजपासून सुटका करू शकता.

इन्स्टंट मेसेजिंग App ने नुकतंच Archived चॅट फीचरचं रिपॅकेज्ड वर्जन लाँच केलं आहे. यात युजरला एखादा कॉन्टॅक्ट कायमसाठी म्यूट करण्याचा पर्याय मिळतो. जर तुम्ही बोरिंग मेसेजने वैतागला असाल, तर असे कॉन्टॅक्ट Archived मध्ये टाकू शकता.

WhatsApp वर युजर्सला म्यूट कसं कराल?

म्यूट करण्यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून त्यात तुम्हाला सतत मेसेज करणारे जेवढे युजर्स असतील त्या सर्वांना सिलेक्ट करा.

त्यानंतर Contact या पर्यायाला काही वेळ लाँग प्रेस करा. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेले युजर्स आपोआप म्यूट होतील.

व्हॉट्सअ‍ॅपवर Archived Contacts कसं शोधाल?

व्हॉट्सअ‍ॅपवर Archived Contacts पाहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. त्यानंतर होम स्क्रीनच्या वर Archive Chat Section चा ऑप्शन असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Archived Contacts ची लिस्ट युजर्सच्या स्क्रिनवर येईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर Contacts Unarchived कसं कराल?

व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून होम स्क्रीनवरील Archive Section वर क्लिक करा. त्यानंतर ज्या Contact ला तुम्ही Unarchived करू इच्छिता त्याला सिलेक्ट करून लॉन्ग प्रेस करा. त्यानंतर एन्टर केल्यानंतर सिलेक्टेड Contact लगेचच Unarchived होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here