उदगीर : येथील राजमाता आहिल्याबाई होळकर व राज्याचे माजी मुख्यमंत्री वंसतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी राज्यशासनाने वैशिष्ट्यपुर्ण योजनेतून 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
यातून शहरातील या दोन्ही पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे ‘शस्त्र आणि शास्त्र’ या दोन्हीची शिकवण देणाऱ्या माँसाहेबांच्या अश्वारुढ पुतळ्यातूनच प्रेरणा मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक कुशल प्रशासक, एक मुत्सद्दी राजकारणी आणि महापराक्रमी महाराणी होत्या. यांच्या व्यक्तीमत्वातील पराक्रमी पैलूही जनमाणसात रूजविण्याच्या हेतूने याची उभारणी करण्यात येत आहे.
तसेच अनेक वर्षे पासून येथील गोर बंजारा समाजाची प्रामुख्याने उदगीर येथील स्व. वसंतराव नाईक चौक येथे स्व. वसंतराव नाईक यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी विनंती केली होती.
त्याचा पाठपुरावा करत राज्याचे राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांनी यांच्या विनंतीला मान देत यासाठी 25 लाख रुपये मंजुर करून दिला आहे.
यामुळे येथील गोर बंजारा समाजाच्यावतीने उदगीर येथे विविध ठिकाणी राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेबांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
उदगीर येथील या महापुरुषाच्या पुतळ्याचे काम अंत्यत दर्जेदार करण्यात येणार आहे. हे काम त्वरित सुरू करण्यात येणार आहे; अशी माहिती राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे