लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिच्याच घरात केली चोरी

0
461
Aurangabad house of beloved was burglarized by lover, he said to teach a lesson

औरंगाबाद : प्रेयसी सतत लग्न करण्याचा तगादा लावते म्हणून तिला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने तिच्या घरी घरफोडी केल्याचा अजब प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे.

शहरातील जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये (Jinsi Police station) आठ दिवसांपूर्वी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास घेण्यासाठी पोलिसांना आठ दिवस लागले.

मात्र तपास (Police investigation)पूर्ण झाल्यावर गुन्हेगार समोर आला. पण तो या घरातील महिलेचा प्रियकरच असल्याचे उघड झाल्यावर, या अजब प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी घटनेबाबत अधिक चौकशी केली असता, प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आपण ही चोरी केल्याचं त्याने पोलीस चौकशीत सांगितलं आहे.

सिकंदर खान असं अटक केलल्या आरोपी प्रियकराचं नाव असून तो रिक्षाचालक आहे. फिर्यादी महिलेचं गेल्या दोन वर्षांपासून आरोपी प्रियकराशी प्रेमसंबंध सुरू होते.

मात्र फिर्यादी महिला गेल्या काही दिवसांपासून आरोपी प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावत होती. आरोपी विवाहित असल्याने तो सतत तिला लग्नासाठी नकार देत होता.

प्रेयसी काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. यातून आरोपीनं प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिच्याच घरात चोरी करण्याचा प्लॅन बनवला. त्यानुसार, आरोपीनं 22 ऑक्टोबर रोजी फिर्यादी महिलेला तिच्या आईकडे नेऊन सोडलं.

तसेच आपण गावी जाणार असल्याचं प्रेयसीला सांगितले पण घरी न जाता प्रियकर परत माघारी गेला आणि त्याने प्रेयसीच्या घरात चोरी केली. आरोपीने प्रेयसीच्या घरातील 57 हजार रुपयांवर डल्ला मारून गायब झाला.

पोलिसांनी स्थानिक खबऱ्याच्या मदतीने या गुन्ह्याची उकल केली आहे. खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित म्हणून आरोपी रिक्षाचालक सिकंदर याला ताब्यात घेतलं.

ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, आरोपी प्रियकराने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रियकरानेच चोरी केल्याचं फिर्यादी महिलेला कळताच तिच्याही पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

हे देखील वाचा 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here